लावण्यवती! – Lavanyavati
लावण्यवती मध्ये तुम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळतील बैठकीच्या आणि फडावरच्या ठसकेबाज लावण्या!
महाराष्ट्राच्या लोककला परंपरेतील लखलखता हिरा आहे लावणी! आणि ह्या हिऱ्याच्या विविध छटा आपल्यापुढे उलगडण्यासाठी येत आहेत सुप्रसिद्ध गायिका आणि निवेदिका डॉ. मृदुला दाढे जोशी!
त्यांच्या जोडीला असतील लावणीच्या बाजातील गायकीसाठी प्रसिध्द असलेल्या गायिका – जुईलीजोगळेकर आणि मधुरा कुंभार पाध्ये! बरोबर असतील हरहुन्नरी गायक निलेश निरगुडकर आणि त्यांच्या साथीला असेल एकाहून एक वादकांचा ताफा!