Our Mission & Vision

MMA 2022 Team

Meet our Amazing Team!

2022 Executive Committee & Team

Pushkar Deshpande

Pushkar Deshpande

President, 2022

Nilesh Likhite

Nilesh Likhite

Treasurer, 2022

श्री निलेश लिखिते हे सनदी लेखपाल (Chartered Accountant) असून व ICAI चे २००८ पा सुन सदस्य आहेत. त्यांना २०१७ पासुन जॉर्जिया राज्याची CPA म्हणून सनदही प्राप्त झाली आहे. ते सध्या ॲटलांटा येथे प्रथितयश बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये Real Estate, Hospitality & Construction क्षेत्रांशी निगडीत कार्यरत आहेत. निलेश सामाजिक क्षेत्रातील अनेक उपक्रमां मधे धडाडी ने सहभाग घेतात, प्रामुख्याने Juniors Achievements in Atlanta मधील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.हे अमेरिकेत येण्या पुर्वी ते महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते. निलेश हे २०२२ च्या कार्यकारीणीत कोषाध्यक्ष म्हणून सेवा देऊ इच्छितात.

Prajakta Padgaonkar

Prajakta Padgaonkar

Secretary, 2022

एक लेखिका , Senior Care Researcher, आणि यशस्वी घर खरेदि विक्री व्यवसायिक म्हणून ओळख असलेल्या सौ. प्राजक्ता पाडगांवकर गेल्या वर्षी त्यांनी अत्यंत कुशलतेने आयोजित केलेल्या व लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळालेल्या निसर्गवारी तसेच वसंत व्याख्यानमालेमुळे आपल्या सर्वांना परिचित आहेत. प्राजक्ता यांनी Russian Didactics & Literature मधे MPhil केले असुन त्यांचे मराठी व्यतिरिक्त हिंदी, उर्दू, इंग्रजी , रशियन तसेच जर्मन भाषेवरही प्रभुत्व आहे. प्राजक्ता यांचे राजहंस प्रकाशना तर्फे नुकतेच पुस्तक प्रकाशीत झाले आहे तसेच त्या लोकप्रभा व दैनिक लोकसत्तेमधे नियमित स्तंभलेखन करता त. गेली ५ वर्षे बृहन्महाराष्ट्र मंडळ वृत्ता मधे त्यांचे अनेक लेख लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. महाराष्ट्र मंडळ, IACA, चिन्मया नंद मिशन, ग्रीन सेल अशा अनेक अटलांटा स्थित लोकाभिमुख संस्थांसाठी स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाच्या वृद्ध संगोपन सल्लागार म्हणून देखील त्या कार्य करतात.

Dr Anant Honkan

Dr Anant Honkan

Executive Committee Member

होंकणकाका नावाने आपणा सर्वांना परिचित डॉ. अनंत होंकण २००५ साली ॲटलांटा येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्रमंडळा च्या अधिवेशना पासून मंडळांशी संलग्न आहेत.
उच्चविद्या विभूषीत डॉ. होंकण यांनी मेकॅनिकल इंजिनिअरींगमधे PhD प्राप्त केल्या नंतर संगणकशा स्त्रात MS केले आहे. हे डॉ. होंकण सध्या Professor of Engineering म्हणून कार्यरत असून Regents Engineering Pathways संस्थेच्या संचा लकपदावर आहेत. तत्पूर्वी त्यांनी Dekalb College येथेही Instructor of Engineering & Computer Science पदावर सेवा दिली आहे. डॉ. होंकण हे प्रतिष्ठीत Global Thrombosis Forum (GTF) चे मानद सदस्यही आहेत.
गेली अनेक वर्षे होंकणकाका महाराष्ट्र मंडळ ॲटलांटाच्या जेष्ठांच्या समितीत सक्रिय आहेत. २०२२च्या MMA कार्यकारीणीत ते मार्गदर्शन करतील.

Amruta Bhargave

Amruta Bhargave

Executive Committee Member

सध्या गृहिणी म्हणून परिवार सांभाळणाऱ्या सौ. अमृता केदार काळे, २०२१ च्या सुरुवातीला शिकागोहून अल्फारेटा येथे स्थायिक झाल्यात. अमृता यांना लहानपणापासून अभिनयाची आवड असून राज्यस्तरीय नाट्य स्पर्धा , वक्तृत्व, कथा कथन, निबंध स्पर्धा ह्यांत त्यांनी अनेक पारितोषिके संपादन केली आहेत. त्यांना महाविद्यालयीन स्तरा वर वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्याचा ही अनुभव आहे. BE, MBA करून भारतात IT क्षेत्रात काम केल्यावर त्यांना अमेरिकेत येण्याचा योग आला . शिकागो येथील हिंदू स्वयंसेवक संघ आणि महाराष्ट्र मंडळ शिकागो ह्या संस्थां मध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता . गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र मंडळ शिकागो तर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे निवेदन त्यांनी केले होते. हा पुर्वानुभव गाठीस धरून महाराष्ट्र मंडळ अटलांटा साठी काम करण्यास अमृता उत्सुक आहेत.

Pranjali Likhite

Pranjali Likhite

Executive Committee Member

सौ. प्रांजली लिखिते यांनी Human Resource विषयात दालमिया कॉलेजमधुन MBA केले आहे. त्या सध्या HR म्हणून पुर्णवेळ का र्यरत आहेत. सौ प्रांजली लिखिते व श्री निलेश लिखिते २०१४ पासून सॅण्डी स्प्रिंग येथे वास्तव्यास आहेत.

Madhura Khare

Madhura Khare

Executive Committee Member

सौ. मधुरा खरे यांनी संस्कृत विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्या संस्कृत भारतीसाठी कार्यरत आहेत. मधुरा भारतीय शास्त्रीय संगीतात विशारद असुन विद्यार्थ्यांना गाण्याचे प्रशिक्षण देतात. त्यांना Craft मधे विशेष रुची असुन त्या “कलाश्री ” नावाने कुंदन रांगोळीचा व्यवसाय करतात. मधुरा सध्या ॲटलांटा येथे Walmart Corporate Office मधे नोकरी करीत आहे. शिकागो येथून ॲटलांटाला परिवारा सोबत स्थायिक झालेल्या अमृता यांना ॲटलांटा महाराष्ट्र मंडळात कार्यकरण्याची इच्छा आहे.

Gautam Kulkarni

Gautam Kulkarni

Executive Committee Member

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असलेले श्री गौतम कुलकर्णी हे एक उत्तम गायकही आहेत. त्यांनी आजवर जवळपास शंभरच्या वर गाण्याचे कार्यक्रम केले आहेत. मुळचे पुण्याचे गौतम त्यांची पत्नी शलाका व १० वर्षांचा मुलगा अर्णवसह २०१६ पासून ॲटलांटाच्या आहेत. सामाजिक क्षेत्रा त काम करण्याची आवड असलेले गौतम Green सेल Group चे सदस्य आहेत, कम्युनिटीचे HOA तसेच Asian Community Group चे सदस्यही आहेत. महाराष्ट्र मंडळ अटलांटा तर्फे २०२२ मधील आयोजनांसाठी भरिव योगदा न देण्याची गौतम यांची इच्छा आहे.

Sushil Raje

Sushil Raje

Executive Committee Member