अॅटलांटा महाराष्ट्र मंडळाची युवा शाखा सुद्धा आहे. ह्या शाखेअंतर्गत आपले मराठी युवक युवती अनेक चांगले उपक्रम राबवतात. ह्यातूनच त्यांना नेतृत्व, आयोजन इत्यादी अनेक गोष्टी शिकावयास मिळतात. २०१७ च्या युवा समितीने चालू केलेले काही उपक्रम खालीलप्रमाणे
  1. महाराष्ट्र मंडळाचे कार्यक्रम चालू असताना, लहान मुलांसाठी करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करणे आणि ते कार्यक्रम चालू असताना मुलांवर लक्ष ठेऊन कार्यक्रम सुरळीत पार पाडणे.
  2. ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र मंडळाच्या कार्यक्रमांना नेणे आणि परत घरी सोडणे
  3. मराठी सणांची माहीती संकलित करून इमेल द्वारे सर्व मराठी मुलांपर्यंत पोचवणे