महाराष्ट्र मंडळ अॅटलांटा

मुखपृष्ठ कार्यक्रम गुजगोष्टी सभासदत्व कार्यकारिणी विश्वस्त युवा चित्रसंग्रह जाहिराती ब्लॉग बातम्या प्रश्नोत्तरे
English | मराठी

नमस्कार,

अॅटलांटा महाराष्ट्र मंडळाच्या संकेत स्थळावर हार्दिक स्वागत!

जॉर्जियाची राजधानी असलेलं अॅटलांटा, अमेरिकन यादवी युद्धात बेचिराख होऊनही आज अमेरिकेतील महत्त्वाचे आर्थिक शहर बनलेले अॅटलांटा, कोकाकोला, डेल्टा, होम डेपो आणि यूपीएस सारख्या मोठ्या मोठ्या कंपन्यांचं मुख्य कार्यालय असलेलं अॅटलांटा, स्टोन माऊंटन पासून ते अनेकविध राष्ट्रीय उद्यानांनी नटलेलं अॅटलांटा, अशी अॅटलांटाची अनेक प्रकारे ओळख करून देता येईल. अॅटलांटाच्या बरोबरीनेच इथे राहाणाऱ्या मराठी भाषिक मंडळींची इतरांना ओळख व्हावी, इथल्या कलाकारांना आपले कलाविष्कार दाखवायला एक हक्काचं स्थान मिळावं हाच अॅटलांटा महाराष्ट्र मंडळाचा प्रयत्न.
अॅटलांटा मराठी मंडळात आपण मकर संक्रांती, गुढीपाडवा, गणेशोत्सव, गरबा आणि दिवाळी असे ५ मुख्य कार्यक्रम साजरे करतोच, पण त्याच बरोबरीने भेटीगाठी, सार्वजनिक सहल, युवांसाठी कार्यक्रम असे इतरही अनेक उपक्रम हाती घेतो.
आपल्या अॅटलांटा मराठी मंडळाच्या सभासदत्वासाठी वार्षिक वर्गणी भरून सभासद होता येते. प्रत्येक कार्यक्रमाबद्दल सभासदांना इ-मेल ने कळवण्यात येते. या संकेत स्थळावरील 'कार्यक्रम' ही लिंक वापरून मंडळाच्या भावी कार्यक्रमांची माहिती मिळवता ये‌ईल किंवा कार्यक्रमातील आपल्या सहभागाबद्दल विनंती करता ये‌ईल.
संकेत स्थळाला भेट दिल्याबद्दल आभार.

आपले अॅटलांटा महाराष्ट्र मंडळ

Sponsors
Pallavi Sathe KW Realty

Pallavi Sathe

KW Realty

Subscribe

महाराष्ट्र मंडळाच्या सर्व उपक्रमांची आणि कार्यक्रमांची माहीती आम्ही वेळोवेळी ईमेलद्वारे आमच्या सभासदांना पाठवत असतो.
ही माहीती तुमच्यापर्यंत वेळेत पोचावता यावी म्हणून खालील फॉर्मद्वारे तुम्ही तुमचा ईमेल आम्हाला कळवा.

* indicates required
() - (###) ###-####