गुजगोष्टी २०१८ माहिती


गणपतीच्या मिरवणुकीचे आणि दांडियाच्या तालाचे वेध लागायला सुरवात होऊ लागली आणि याबरोबरच तयारी सुरु झाली आहे ती आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहतो त्या दरवर्षी दिवाळीत निघणाऱ्या गुजगोष्टी अंकाची. ह्या वर्षी आम्ही सभासदांच्या जास्तीत जास्त सहभागाचे प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे या वर्षीच्या आपल्या गुजगोष्टी अंकात तुमचं साहित्य प्रसिध्द करण्यासाठी आम्हाला पाठवा म्हणून आम्ही आपल्याला आवाहन करीत आहोत त्याचबरोबर मुखपृष्ठ स्पर्धेचेही आयोजन करीत आहोत.

 

विशेष सूचना -
१. गुजगोष्टी अंकासाठी पाठवले जाणारे साहित्य हे पूर्वप्रकाशित नसावे तसेच अंक प्रकाशित होईपर्यंत अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी कृपया पाठवू नये. याने सर्व साहित्याची कल्पकता (originality) जपण्यास मदत होईल. 
२. लिखाण जास्तीत जास्त ४ किंवा त्या पेक्षा कमी पानांचे असावे.
 

मुखपृष्ठ स्पर्धा -
१. प्रत्येकी एक प्रवेशिका पाठवू शकता 
२. फक्त छायाचित्र नसावे परंतु छायाचित्रचा कुशल वापर थोड्या प्रमाणावर चालू शकेल 
३. प्रवेशिकेची कल्पना स्वतःची(original) असावी व ती पूर्वप्रकाशित असू नये.
४. प्रवेशिका कमीतकमी 300 DPI high resolution digital image असावी. 
५. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख २५ ऑगस्ट ही राहील. 

मुखपृष्ठाबाबत अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल याची कृपया नोंद घ्यावी.  
 

यावर्षीच्या गुजगोष्टी अंकाची रूपरेषा अशी असेल –

मुक्त गट  - या गटागटातील साहित्य शक्यतो मराठीत पाठवावे. 

१.  कथा विभाग - या वर्षी सुद्धा उत्तम लेखनासाठी उत्तेजन मिळावे म्हणून आपण कथास्पर्धा जाहीर करीत आहोत  प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या दोन कथा आणि  दोन उत्तेजनार्थ कथा अंकात प्रकाशित होतील 
२. वर्णनात्मक लेख विभाग - उदाहरणार्थ प्रवास वर्णन , अनुभव कथन 

३. अन्न हे  पूर्णब्रह्म - सध्या खूप प्रचलित नसलेल्या जुन्या अथवा नव्या आगळया वेगळ्या पाककृती
                          - प्रवासात समोर आलेल्या काही अप्रतिम पदार्थनाचे छायाचतीत्रासह वर्णन 
४. आरोग्य विभाग -  आरोग्याशी संबंधित लेख , सूचना आणि तत्सम 

याव्यतिरिक्त पाठवायला विसरू नका-

भावविभोर कविता - विषयाचे बंधन नाही 
 आणि 
छोटे चुटकुले 

साहित्य प्रकाशित करताना  सगळ्या वयोगटातील वाचकवर्गाला रुचेल आणि  संपादक मंडळ व परीक्षकांच्या मतानुसार उत्तम ठरेल अशा साहित्याला प्राधान्य दिले जाईल.


 युवा गट

युवागटासाठी  आणि इंग्रजी विभागही असेल, तसेच दिलेल्या विषयां व्यतिरिक्त इतर विषयांवरील लेख सुद्धा स्वीकारले जातील.

प्रवेशिका पाठवण्यासाठी आपले साहित्य गूगल डॉक्स (Google Docs) मध्ये साठवून, आमच्या संपादक मंडळाशी शेअर करा. मंडळाचा आयडी आहेmma2018gg@gmail.com
 
प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीख : २५ ऑगस्ट २०१८

प्रताधिकारा संबंधी -

येणार्‍या प्रत्येक प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी तुम्ही अ‍ॅटलांटा महाराष्ट्र मंडळाला त्या प्रवेशिकेला "गुजगोष्टी" ह्या वार्षिक अंकामध्ये प्रसिद्ध करण्याचा किंवा त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.
याचा अर्थ -
* प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करू अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता.
* परंतु अ‍ॅटलांटा महाराष्ट्र मंडळ ती प्रवेशिका "गुजगोष्टी" अंकामध्ये अथवा इतर कुठल्याही माध्यमांमध्ये अनिर्बंध वापरु शकते. (अमर्याद परवाना)
यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया संपादक मंडळाशी mma2018gg@gmail.com या ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.गुजगोष्टी अंक २०१७